COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लातूर : लातूरच्या केळगावमध्ये अवैध दारु विक्रीविरोधात गावातल्या महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं ठोकलं. अशाप्रकारे अवैध दारु विक्रीमुळे गावातील वातावरण दूषित झालं असून या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत कार्यालय आणि पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामसभा चालू असतानाच विरोध दर्शवला.


ग्रामपंचायतील टाळं 


तर महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं ठोकलं. जोवर गावातील दारु दुकानं बंद होत नाहीत तोवर ग्रामपंचायत बंद ठेवण्याचा इशाराही ग्रामस्थांनी यावेळी दिला. अवैध दारु विक्रीमुळे गावची तरुण पिढी व्यसनाधीन होतेय आणि संसार उघड्यावर येत असल्याने महिलांनी सरपंच तसंच ग्रामसेवकालाही खडसावलं.


पोलिसांच्या आशीर्वादामुळेच ही अवैध दारु विक्री सुरु असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. पोलिसांनी याकडं दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलायं.