कल्याण : Kalyan jewellers shop theft : खरेदीदार म्हणून आल्या आणि ज्वेलर्सच्या दुकानातून लाखोंचे दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना येथे घडली. बुरखाधारी महिला सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत. या महिलांनी ज्वेलर्स मालक आणि दुकानातील कामगारांना बोलण्यात गुंतवून ठेवत चलाखी करत सोन्याचे दागिणे लंपास केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याणमध्ये भर बाजारातील एका ज्वेलर्स दुकानात खरेदीदार म्हणून आलेल्या दोन बुरखाधारी महिलांनी दुकानातील चार तोळे सोन्याचे दागिने घेऊन पळ काढल्याची घटना उघडकीस आली आहे. या दोन्ही बुरखाधारी महिला दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या आहेत. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे


कल्याण स्टेशन परिसरात एस. आर. शंकलेशा ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास या दुकानात दोन बुरखाधारी महिला दागिने खरेदी करण्यासाठी आल्या. या महिलांनी सोन्याचा डिझाईनचा नेकलेस सेट आणि कानातल्या ईअररिंग पाहण्याचा बहाणा केला. मालक आणि दुकानातील कामगारांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या समोर ठेवलेल्या एका प्लास्टिकच्या बॉक्समधील चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने नजर चुकवून हातचलाखीने पिशवीत टाकले आणि या दोन्ही महिला दुकानातून निघून गेल्या, अशी माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाणे  यांनी माहिती दिली.


काही वेळाने मालकाला दुकानात दागिने चोरी झाल्याचे लक्षात आले. दुकान मालकाने याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या पोलिसांनी या दोन्ही बुरखाधारी महिलाचा शोध सुरु केला आहे. बुरखा घातल्यामुले या दोन्ही महिलांचा शोध घेणे पोलिसांना कठिण होऊन बसले आहे.