अमरावती : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचं वारंवार दावा करीत असले तरी शेतकाऱ्यांचा सय्यमचा बांध आता फुटू लागला आहे. अमरावती जिल्ह्यातील वेणी गणेशपूर या गावातील अल्पभूधारक महिला शेतकरी ताई भगवानराव जुमाडे यांनी हातचे सोयाबीन गेल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडल्याने शेतातच गळफास लावून आत्महत्या केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर्षी पावसाळ्यात पावसाचा 3 ते 4 वेळा मोठा खंड पडल्याने विदर्भाच प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनला शेंगाच न लागल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे .अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वेणी गणेशपूर गावातील ताई भगवानराव जुमाडे या महिला शेतकरी यांनी आपल्या शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.


ताई जुमाडे या कुटुंबातील कर्त्या होत्या सर्व आर्थिक व्यवहार त्या सांभाळायच्या जुमळे कुटूंबीयांनी घरचे 2 एकर आणि मकत्याची 10 एकर जमिनीवर सोयाबीन आणि तुरीची लागवड केलेली आहे. यावर्षी सरकारच्या कर्जमाफीची घोषणा रेंगाळल्या मुळे पीक कर्ज मिळाले नाही आणि तातडीची मदतही मिळत नाही अशा परिस्थितीत ताईबाई यांनी नातेवाईक आणि सावकाराकडून कर्ज घेतले होते. सोयाबीन हातचे गेल्यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडायचे या चिंतेत त्या होत्या अखेर त्यानी काल सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान शेतात जाऊन गळफास लावून आत्महत्या केली 


वेणी गणेशपूर या गावाची 3000 लोकसंख्या असून गावातील सर्वांचा शेती व शेतमजुरी हाच मुख्य व्यवसाय आहे. गावातील सर्वच शेतकऱ्याची अशीच परिस्थिती आहे ताईबाई यांना वेळेवर नवीन पीक कर्ज मिळाले असते तर त्यांना सावकाराकडून कर्ज घेण्याची आवश्यकता राहिली नसती आणि आत्महत्या करण्याची त्याच्यावर ही वेळही आली नसती.


अमरावती, अकोला ,बुलढाणा, वाशीम ,यवतमाळ या जिल्ह्यातही कोरडवाहू शेतकऱ्यांची अशीच परिस्थिती आहे शेतकऱ्यांचे जुने कर्जही माफ झाले नाही. नवीन कर्जही मिळाले नाही आणि तात्काळ दहा हजार रुपये ची मदतही मिळाली नाही शेतकऱ्यांनी होता नव्हता जवळचा, उसनवारी कडून आणलेल्या पैशांनी शेतीची पेरणी केली मात्र पावसाने दगा दिल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. यावर सरकारच्या वतीने जर तात्काळ उपाययोजना केल्या नाही तर शेतकरी आत्महत्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही