नांदेड : दोन वर्षांपूर्वी बाटली आडवी करुनही पुन्हा देशी दारुचा अड्डा सुरू झाल्याने महिला आक्रमक झाल्या आणि त्यांनी थेट दारु अड्ड्यावर हल्लाबोल करत कुलूप ठोकलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नांदेड शहरातल्या दीपनगर इथल्या मुख्य रस्त्यावर हा प्रकार घडला. अड्डा बंद केल्यानंतर महिला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी महिला गेल्या असता जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगीच दिली नसल्याचं समोर आले. 


दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी फोनवरुन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केली. यापुढे हा अड्डा सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास हा अड्डा उध्वस्त करण्याचा इशारा महिलांनी दिला.