कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील तंत्र शिक्षण विभागातील विलगिकरण केंद्रातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विलगीकरण कक्षातील वॉर्डबॉयने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे. विनयभंग करणाऱ्या वॉर्डबॉयला मुलीच्या नातेवाईकांनी चोप दिला. संबधित वॉर्डबॉय विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे सुविधा मिळत नसल्यान अन्य लोकांनी ही विलगीकरण कक्षातील कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं. एकाच वेळी घडलेल्या दोन्ही प्रकारामुळे विलगीकरण कक्षात एकच गोंधळ उडाला होता. 


काही दिवसांपूर्वीच पनवेलमधील विलगीकरण कक्षात 40 वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यामुळे विलगीकरण कक्षात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.