नितेश महाजन, झी मीडिया, जालना : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक कर्मचारी संघटनेने बेमुदत कामबंद आंदोलनाचं हत्यार उपसले आहे. संघटनेच्या वतीने 22 ऑगस्ट पासून विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलंय. सर्वच ग्रामसेवक कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी झाल्याने जिल्ह्यातील 700 ग्रामपंचायत कार्यालये आणि पंचायत समित्यांचा  कारभार मागील 19 दिवसापासून ठप्प झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रामसेवक संवर्गास दरमहा तीन हजार रुपये प्रवास भत्ता मंजूर करावा,ग्रामसेवकाच्या शैक्षणिक अर्हतेत बदल करावा,कोणत्याही शाखा पदवीधर ग्रामसेवक भरतीत समाविष्ट करावा,सातवा वेतन आयोगातील त्रुटी काढून त्यात नव्याने सुधारणा करावी या मागण्यासाठी मागील 19 दिवसापासून ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलनात सहभाग घेतलाय.



त्यामुळे राज्यातील 22 हजार ग्रामसेवक संप पुकारत काम बंद आंदोलनात सहभागी झाल्याने जनतेची कामं खोळंबली आहे.दरम्यान सरकारकडून मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आणखी आंदोलन तीव्र करण्याचा ईशारा या कर्मचाऱ्यांनी दिलाय.