पुणे : सदाशिव पेठेतील बिर्याणीसाठी प्रसिध्द असलेल्या ‘एसपी’ज बिर्याणी हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकाला चक्क बिर्याणीत अळ्या सापडल्या. याचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल होत आहे. दुपारी एका ग्राहकाच्या ताटात अळी आढळून आली. ही बाब त्याने तिथल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. त्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. या घटनेमुळे पुणेकर खवैय्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, हे आपल्या विरोधात षड्यंत्र असल्याचा दावा हॉटेलतर्फे करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'एसपी'ज बिर्याणी हाऊसमध्ये बिर्याणीची ऑर्डर दिली. अर्धे जेवण झाल्यानंतर ग्राहकाच्या ताटात अळी असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याने जेवण तसेच अर्धवट सोडून दिले. अळ्यायुक्त बिर्याणीचा हा प्रकार मोबाईलमध्ये कैद करण्यात आला. हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, जाणून बुजून आमच्यावर आरोप केले जात आहे. अशी अळी बिर्याणीमध्ये राहणे शक्य नाही. १२० डिग्रीमध्ये आळी जिवंत राहील कशी, असे मॅनेजरचे म्हणणे आहे.