अकरावी, बारावी विज्ञान शाखेच्या प्रश्नपत्रिकांचं स्वरुप बदलणार!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा अकरावी व बारावीच्या विज्ञान शाखेच्या प्रश्नपत्रिकांचं स्वरूप बदलण्याचा विचार केला आहे.
पुणे : अकरावी आणि बारावीच्या विज्ञान शाखेच्या प्रश्नपत्रिकांचं स्वरुप बदलणार आहे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा अकरावी व बारावीच्या विज्ञान शाखेच्या प्रश्नपत्रिकांचं स्वरूप बदलण्याचा विचार केला आहे. त्यादृष्टीनं आराखडा बनवायचं कामही सुरु झालं आहे.
मात्र, प्रॅक्टीकल परीक्षेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
अकरावीसाठी यंदापासून तर बारावीसाठी २०१९ सालापासून हा निर्णय लागू होणार आहे. या निर्णयामुळे जेईई, नीट अशा परिक्षांसाठी विद्यार्थी तयार व्हावेत, यासाठी बदल करणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.
या नव्या आराखड्यानुसार फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी सारख्या विषयांचे १०० गुणांपैकी ७० गुण लेखी परिक्षेसाठी असतली. तर ३० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येईल. तर मॅथमॅटिक्स, न्यूमरलॉजी विषयांसाठी ८० गुणांची लेखी तर २० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येईल.