पोहायला गेला आणि पाण्याच्या प्रवाहाने घात केला, तरुण धरणात बुडाला
कधीकधी अति आत्मविश्वासही धोक्याचा ठरतो. तरुणाच्या बाबतीही असंच घडलं. पाण्यासोबत आत्मविश्वासाने मस्ती करायला गेला आणि....
श्रीकांत राऊत, झी 24 तास, यवतमाळ : कधीकधी अति आत्मविश्वासही धोक्याचा ठरतो. तरुणाच्या बाबतीही असंच घडलं. पाण्यासोबत आत्मविश्वासाने मस्ती करायला गेला आणि घात झाला. महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेनं कुटुंबावर शोककळा पसरला आहे.
यवतमाळच्या बेंबळा धरण प्रकल्पात पोहायला गेलेल्या तरुणाला जीव गमवावा लागला. सचिन बडोद असे त्याचं नाव आहे. तो मित्रांसोबत बेंबळा धरणावर पावसाचा आनंद लुटण्यासाठी गेला होता. सांडव्याच्या पाण्यात बुडतानाचा त्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित झाला. पाण्यातलं आततायी धाडस कसं जीवावर बेतू शकतं हे यातून समोर आलं आहे.
तरुणाची पाण्यात उतरतानाची मौजमस्ती कशी जीवावर बेतणारी ठरू शकते हे त्यातून पुढे आले आहे. सचिन मित्रांसोबत सांडव्यातील पाण्यात पोहोण्यासाठी उतरला. यावेळी पाण्याचा प्रवाह वाढला आणि घात झाला.
पोहोण्याच्या प्रयत्नात असताना पाण्याच्या प्रवाहाने तो वाहून गेला आणि पाण्यात बुडाला. मित्रांनी आणि उपस्थित नागरिकांनी त्याचा शोध घेतला. या घटनेनंतर तरुणांचा आनंद क्षणार्धात शोकात बदलला.