Crime News : यवतमाळच्या (Yavatmal News) बाभूळगाव नगर पंचायतचे नगरसेवक अनिकेत गावंडे (Aniket Gawande) यांची धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्री हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पैशाच्या वादातून ही निर्घृण हत्या झाल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी सुरु आहे. धारदार शस्त्राने वार केल्याने या नगसेवकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर यवळतमाळमध्ये एकच खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिकेत गावंडे यांनी रेती व्यवसायात जम बसवला होता. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करुन प्रहार पक्षाकडून नगरपंचायत निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत अनिकेत गावंडे नगरसेवक म्हणून निवडूण आले होते. रेती व्यवसायातील पैशातून त्यांचा रविवारी रात्री काही जणांसोबत वाद झाला. त्यानंतर आरोपींनी गावंडे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. जखमी अनिकेत यांना यवतमाळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या खून प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.


पिस्टल हातात घेऊन रिल्स बनवणाऱ्या माजी नगरसेवकाच्या मुलावर गुन्हा


सोलापुरात रंगपंचमी नागरिकांनी मोठ्या उत्साहाने आनंद साजरी करण्यात आलीय. रंग खेळतानाचे अनेक नागरिकांनी रिल्स तयार करून सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. दुसरीकडे माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांचे पुत्र चेतन गायकवाड व राजू भंडारी हा दोघांनी वादग्रस्त रिल्स तयार करून फेसबुकवर अपलोड केले आहेत. नगरसेवक पुत्रांनी बुलेट चालवत हात सोडून हातात पिस्टल घेऊन रिल्स तयार केले आहे. हे सोशल मीडियावर वायरल होताच सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.