मुख्य वनसंरक्षक मुंडेंना घेराव वनपाल वनरक्षकांना पडणार महागात
अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. आर. मुंडे यांना शासकीय बैठक सुरु असताना घेराव घालणं वनपाल वनरक्षकांना महागात पडण्याची चिन्हं आहेत. वनपाल वनसंरक्षकांचे अधिकाऱ्यांसोबतचे संभाषण अयोग्य आणि अशोभनीय होते. त्यांचे वक्तव्य हे बेशिस्त गैरवर्तन असून शिस्तभंगविषयक कारवाईस पात्र आहे. घेराव घालण्यासाठी वनरक्षक वनपाल हे वरिष्ठ अधिकाऱयांची परवानगी न घेता आले असल्यास त्यांचेवर कडक कारवाईच्या सूचना अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक ए आर मंडे यांनी उपवनसंरक्षकांना दिल्या आहेत.
यवतमाळ : अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. आर. मुंडे यांना शासकीय बैठक सुरु असताना घेराव घालणं वनपाल वनरक्षकांना महागात पडण्याची चिन्हं आहेत.
वनपाल वनसंरक्षकांचे अधिकाऱ्यांसोबतचे संभाषण अयोग्य आणि अशोभनीय होते. त्यांचे वक्तव्य हे बेशिस्त गैरवर्तन असून शिस्तभंगविषयक कारवाईस पात्र आहे. घेराव घालण्यासाठी वनरक्षक वनपाल हे वरिष्ठ अधिकाऱयांची परवानगी न घेता आले असल्यास त्यांचेवर कडक कारवाईच्या सूचना अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक ए आर मंडे यांनी उपवनसंरक्षकांना दिल्या आहेत.