यवतमाळमध्ये भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत चौघांचा जागीच मृ्त्यू
Yavatmal Accident : यवतमाळमधून भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे.. दोन वाहनांची जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झालाय. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झालाय.
श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : यवतमाळच्या (Yavatmal) करंजी मार्गर्गावरील कोठोडा गावाजवळ वृत्तपत्र घेऊन जाणाऱ्या व्हॅन चा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. वरोरा येथून ही व्हॅन वृत्तपत्र घेऊन पांढरकवडा येथे येत असताना हा अपघात घडलाय. पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाने व्हॅनला जोरदार धडक दिली. यात व्हॅन चालकासह चौघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर व्हॅनला धडक देणाऱ्या वाहनाने तिथून पळ काढला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांना पोलिसांना (Yavatmal Police) याबाबत कळवलं. त्यानंतर वाहनातून मृतदेह बाहेर काढण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, वृत्तपत्र घेऊन ही व्हॅन वरोरा येथून मारेगाव मार्गावरुन यवतमाळच्या पांढरकवडा इथे जात होती. मात्र पहाटेच्या सुमारास या व्हॅनला अज्ञात वाहनाने समोरच्या बाजूला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. व्हॅनला समोरच्या बाजूने जोरात धडक बसल्याने गाडीच्या चालकासह सर्वच जण चिरडले गेले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी राष्ट्रीय महामार्ग करंजी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर त्यांचे मृतदेह देखील बाहेर काढण्यात अडचण येत होती. या अपघातातील मृतांपैकी वाहन चालक किशोर बोरकर या एकाचीच ओळख पटलेली आहे. तर अन्य तिघांच्या मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.
अपघातामुळे वाहतूक कोंडी
या अपघातामुळे करंजीजवळ मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. अपघातामुळे बचावकार्य सुरू असल्याने मागून येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा येथे लागल्या होत्या. वाहतूक महामार्ग करंजी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून वाहतूक पुन्हा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अज्ञात वाहनाने अनेक मेंढ्यांना चिरडले
नागपूर जिल्ह्यातील मौदा जवळ मौदा टी पॉईंटवर मंगळवारी पहाटे एका अज्ञात वाहनाने शेकडो मेंढ्या चिरडल्या आहेत. या घटनेनंतर मेंढ्यांना चिडणारा वाहन घटनास्थळावरून फरार झाला आहे. या अपघात सुमारे 100 ते 150 मीटर पर्यंत महामार्गावर मेंढ्यांचे मृतदेह विखुरलेले आहेत. उन्हाळ्यापासून नागपूर जिल्यात गुजरात राज्यस्थान मधून मोठ्या प्रमानावर मेंढ्याचे कळप येत असतात. सध्या शेतात पिकाची पेरणी होत असल्याने हे कळप राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 नागपूर भंडारा मार्गावरून परत जात असताना मौदा टी पॉईंटवर अज्ञात वाहनाने 40 च्यावर वर मेंढ्या चिरडल्या आहेत.