जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : नरभक्षक असल्याच्या कारणावरून ठार मारण्याच्या आदेश देण्यात आलेल्या यवतमाळच्या टी -१ वाघिणीला वाचवण्यासाठी वन्य जीव प्रेमींनी आता सोशल मीडियाचा आधार घेतला असून या मोहिमेला केवळ भारतच नाही तर जगभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय.


वनविभाग शोधातच 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 नरभक्षक असल्याच्या कारणावरून यवतमाळच्या जंगलातील 'अवनी' (टी -१) वाघिणीला ठार मारण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने वनखात्याला दिले आहेत.


त्यानुसार वन विभागाने हैदराबाद चा शुटर नवाब शाफात आली खान याला बोलावण्यात आले आहे.


सुमारे एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे मात्र अजूनपर्यंत 'अवनी' वाघिणीचा पत्ता लागलेला नाही.


तर इकडे नागपूरच्या वन्य जीव प्रेमींनी अखेरचा प्रयत्न म्हणून या अवनी वाघिणीला जीवदान मिळावे व यासाठी ऑनलाईन  मोहीम सुरु केली.


नागपूरच्या डॉक्टर जेरील बनाईत व मुंबईच्या डॉक्टर सरिता सुब्रामनीयम यांनी हि मोहीम सुरु केली आहे.


कॅम्पेन जोरात 


 इंस्टाग्राम,  फेसबुक,ट्विटर  वर #save avni #Let Avni Live या नावाने जगभरातील वन्य जीव प्रेमींचे लक्ष वेधत आहे.


शिवाय चेंज डॉट org वर ऑनलाईन पिटीशन दाखल करून अवनीला वाचवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


आतापर्यंत या पिटीशन वर जगभरातील ६० हजारांपेक्षा नेटकऱ्यांनी अवनीला वाचवण्याच्या बाजूने आपला कौल दिला आहे.


वाघिणीला ठार मारू नये यासाठी डॉक्टर जेरील बानाईत यांनीच न्यायालयात लढा दिला होता.


वन्यप्रेमींना आशा 


 सोशल माध्यमांवर सुरु असलेल्या अवनीला वाचवण्य बाबतच्या या मोहिमेला देश व जगभरातील प्रसिद्ध व सेलिब्रेटींनी आपला पाठींबा दिला आहे.


अवनीला मारण्यापेक्षा बेशुद्ध करून तिचे स्थलांतर करण्याची मागणी या वन्यजीव प्रेमींनी केली आहे.


जगभरातील हजारो नागरिकांची जनभावना म्हणून हि मोहीम सुरु आहे. किमान या मोहिमिमुळे तरी अवनीचा जीव वाचेल अशी आशा वन्य जीव प्रेमींना आहे.