श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : अवैध दारू विक्री करणाऱ्या युवकाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याने यवतमाळच्या इचोरा गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. आर्णी तालुक्यातील इचोरा गावात महेंद्र देवराव गायकवाड हा अवैध दारू विक्री करीत होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान पांढरकवडा विभागातील पोलिसांच्या पथकाने महेंद्रच्या घरी दारू विकली जात असल्याच्या माहितीवरून धाड मारली. महेंद्र घरून पळायला लागल्याने पोलिसांनी महेंद्रला पकडून मारहाण केली. या मारहाणीत महेंद्र दगावल्याचा आरोप महेंद्रच्या नातेवाईकांनी केला आहे. तर महेंद्रवर यापूर्वी दारूविक्री प्रकरणाचे गुन्हे दाखल आहेत. 



पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केल्यास महेंद्र दरवेळी पळून जात होता. आज देखील तो पळाला मात्र पोलिसांनी त्याला कुठलीही मारहाण केली नसल्याचे पारवा पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान महेंद्रच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांनी आर्णी ग्रामीण रुग्णालयात एकाच आक्रोश केला असून गावात देखील तणावाची स्थिती आहे.