नागपूर : भाजपमधील माझ्या बंडखोरीमुळे मला मंत्रीपद दिले नाही, असे सांगत बंडखोरीला जोडले जात आहे. मात्र, हे खरे नाही. आज संपूर्ण सरकार पीएमओमधून चालविली जात आहे. प्रचारतंत्र, धनतंत्राच्या जोरावर मीडियावर प्रभाव टाकून माझ्यासारख्याला बदनाम केले जाते. मला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मला उमेदवारी देणार नाही, असे सांगितले जाते. अरे, पण हे तर विचारा की मला उमेदवारी हवी आहे का? उमेदवारी न देण्याच्या भीतीने मला तुम्ही भीती दाखवू शकत नाही. मी जनतेकडून निवडून आलेला आहे. मी कशाला भाजप सोडू, तुम्हाला मला काढायचे असेल तर काढून टाका, असे थेट आव्हान बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपला दिलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काटोल येथे आले असताना खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला. जे सरकार पीओमाच्या तालावर चालते, अशा सरकारमध्ये मंत्री होऊन काय मिळणार होते. लोक म्हणतात की अटलबिहारी वाजपेयी यांची सरकारे लोकशाही होती आणि मोदींची सरकार हुकुमशाही आहेत. जर खरे म्हणजे मी बंडखोर असेन तर होय मी बंडखोर आहे. नोटबंदी पक्षाचा नव्हे, कॅबिनेटचा नव्हे तर फक्त मोदींचा निर्णय होता. तो तुघलकी निर्णय होता, असा हल्लाबोल सिन्हा यांनी चढवला. त्याचवेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले.


प्रचारतंत्र, धनतंत्राच्या जोरावर मीडियावर प्रभाव टाकून माझ्यासारख्याला बदनाम केले जाते. मला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मला उमेदवारी देणार नाही, असे सांगितले जाते. अरे, पण हे तर विचारा की मला उमेदवारी हवी आहे का? मला भीती दाखवू नका. मी जनतेतून निवडणून आलोय, हे लक्षात ठेवा. मला काढायचे असेल तर काढा. पण मी काही भाजप सोडणार नाही. आशिष देशमुखसारख्या नेत्यांना माझा सल्ला आहे की, त्यांनीही भाजपमध्ये राहून पक्षाला आरसा दाखवत राहावे. पण स्वतःहुन पक्ष सोडू नये, त्यांना काढायचे असेल तर काढू टाका, असे प्रति आव्हान त्यांनी भाजपला दिले.