कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्ये नेहमीच अनेक कारणांवरून वाद होतो. त्यात भाडं नाकारणं हा मुद्दा तर हमखास वादाचा विषय असतो..त्यामुळे हा वादच निकालात निघावा यासाठी, आता ठाण्यात 'हो रिक्षा' ही नवी संकल्पना राबवली जात आहे. 'ठाणे वैभव पेपर्स' आणि 'आपण भंडार' यांनी पुढाकार घेत  'हो रिक्षा' ही अभिनव संकल्पना ठाण्यात आणली आहे. 'हो रिक्षा' असे स्टिकर असलेल्या रिक्षा कोणतंही भाडं नाकारणार नाहीत... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्लेखनीय म्हणजे, अशा रिक्षाधारकांची सोडत काढून, त्यातल्या ५ रिक्षाधारकांना रोज १५० रुपयांचा किराणा माल कूपन देण्यात येणार आहे. शिवाय अशा रिक्षाधारकांसाठी एका वर्षामध्ये बंपर बक्षीसाचीही सुविधा असणार आहे. रिक्षाचालक तसंच प्रवाशांनीही या आगळ्यावेगळ्या संकल्पनेचं स्वागत केलंय.  


या संकल्पनेला ठाणे आरटीओ तसंच वाहतूक विभागानंही ही पाठिंबा दर्शवलाय.