MLA Yogesh Kadam Car Accident: रायगड हद्दीत असलेल्या पोलादपूर नजीक कशेडी घाटात आमदार योगेश कदम यांच्या गाडीचा (Yogesh Kadam) अपघात झाला होता. या अपघातातून (Car Accident) योगेश कदम थोडक्यात बचावले. मात्र, त्यांच्या साथीदारांना गंभीर दुखापत देखील झाली. अपघातात आमदार कदम यांच्या चालकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झालेत. त्यामुळे त्यांच्या सध्या उपचार सुरू असल्याचं पहायला मिळतंय. अशातच या प्रकरणात मोठा ट्विस्ट आल्याचं पहायला मिळतंय. (yogesh kadam accident in konkan kashedi ghat bengali baba connection says ncp leader sanjay kadam marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

योगेश कदम त्यांच्या अपघातामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. कदम कुटुंबीयांनी घातपाताची शंका व्यक्त केल्याने मोठी खळबळ उडाल्याचं समोर आलं होतं. अशातच या प्रकरणात नवी थेअरी मांडण्यात आल्याचं दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार संजय कदम (Sanjay kadam) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद पेटला आहे. 


रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्याशी संबंधित एका बंगाली बाबानेच (Bangali Baba) हा अपघात घडवून आणला असावा, अशी चर्चा दापोलीत सुरु असल्याचं वक्तव्य संजय कदम यांनी केलंय. खेडमध्ये आलेल्या बंगाली बाबांना त्यांचा शिधा मिळालेला नाही. त्यामुळेच हे कारस्थान रचण्यात आलं का?, असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी विचारला आहे. खेडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये (Press Conference) त्यांनी हे वक्तव्य केलंय.


आणखी वाचा - Maharashtra Politics : मग काम कुठं मागायचं? 'त्या' विधानावर राज ठाकरे यांना अजित पवार यांचा सवाल


दरम्यान, गृह विभाग माझ्याकडेही होतं. मलाही काही गोष्टी कळतात, असं रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी म्हटल्याने चर्चेला उधाण आलं होतं. त्यानंतर, डुप्लिकेट सेनेचे नेते नारळाच्या बागेत गेले तेव्हा त्यांना तिथं लिंबू आणि कापलेलं कोंबडं सापडलं. शिधा मिळण्यासाठी त्यांनीच हा पराक्रम केल्याचं एका भक्ताने सांगितलं. त्यामुळे दापोलीमध्ये वेगळीच चर्चा सुरू आहे, असंही संजय कदम यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी कोणती खुलासे होतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.