नितेश महाजन, झी मीडिया, जालना : जालना जिल्ह्यात कर्जमाफीचं नेमकं काय वास्तव आहे? पाहूयात आमच्या या ग्राऊंड रिपोर्टमधून...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झाली. त्यामुळे गावोगावचा शेतकरी खूष झाला होता. शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीच्या आदल्या दिवशी रक्कम जमा करणार असं आश्वासन सरकारकडून दिलं होतं. पण, जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून एकही पैसा जमा झालेला नाहीये.


जालना जिल्ह्यातील पिंपळगाव थोटे गावचे शेतकरी राजू जाधव आणि रंगनाथ थोटे या दोन्हीही शेतकऱ्यांचं नाव कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांच्या यादीत आलं. पण, बँकेतील खात्यावर अजूनही रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांनी शेतमाल विकून त्यांची दिवाळी साजरी केली.


पहिल्या टप्प्यातीलच शेतकऱ्यांच्या नावावर अजून रक्कम जमा झाली नाही तिथे बाकी शेतकऱ्यांचं काय? असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय.