Nagpur Youth Suicide: नागपूरमध्ये (Nagpur) एक धक्कादायक बातमी समोर येतेय. कामठी येथे एका युवा व्यावसायिकाने (Businessman Suicide) गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, युवा व्यावसायिकाच्या आत्महत्येने एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. (Nagpur Crime News)
 
युवा व्यावसायिकाची आत्महत्या


नागपूरच्या कामठी येथे हा प्रकार घडला आहे. आयुष त्रिवेदी असं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. आयुषचं वय अवघे २६ वर्षीय आहे. आयुष हा बांधकाम साहित्य पुरवण्याचे काम करतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी सकाळी घरातील सर्व सदस्य हॉलमध्ये बसले होते, त्यावेळी आयुष त्याच्या खोलीत होता. दरम्यान, त्याच्या खोलीतून गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यानंतर घरातील सदस्य खोलीत धावले तेव्हा आयुषचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडला होता.


कर्जबाजारीपणामुळं घेतला टोकाचा निर्णय


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुषने मध्यरात्री क्रिकेटची मॅच संपल्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. आयुषला क्रिकेटमध्ये सट्टा लावत होता. सट्टेबाजीमुळं कर्जबाजारीपणा वाढल्यामुळं त्याने आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल उचचले आहे, अशी परिसरात चर्चा आहे. आयुषच्या आत्महत्येची खबर लागताच नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले होते. 


आयुषकडे पिस्तूल कसं आलं?


पोलिस या प्रकरणात पुढील तपास करत आहेत. तसंच, आयुषकडे पिस्तूल कसं आलं याचाही शोध पोलिस घेत आहेत. लवकरच याप्रकरणी माहिती घेऊ अशी ग्वाही पोलिसांनी दिली आहे. 


बीडमध्येही रुग्णाची आत्महत्या


बीडच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. बाळू बहिर असे रुग्णाचे नाव आहे. घटना समजताच शहर पोलीस घटनास्थळी पोहचले असून आत्महत्येचा तपास सुरू आहे. बीड जिल्ह्यातील बीड शहरातील जिल्हा रुग्णालयामध्ये सहा नंबर वार्ड मध्ये अचानक गळफास घेतलेल्या व्यक्ती आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या व्यक्तींना आत्महत्या का केली याचा तपास पोलीस घेत आहेत.


भावाकडून बहिणीच्या प्रियकराची हत्या


नागपूरमध्ये आज आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे.  प्रेम संबंधातील बहिणीचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केल्यानं भावाने तिच्या प्रियकराची हत्या केली आहे. कपिल डोंगरे असे मृतकाचे नाव असून तो मोबाईल शॉपिच दुकान चालवत होता. तर, आरोपीने नंतर पोलिसात जाऊन घटनाक्रम सांगत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.