Pune Viral Story: शहरांमध्ये वाहतुकीच्या कितीही सोयी सुविधा आल्या तरी वेळेवर ऑटो रिक्षा न मिळणं ही समस्या सर्वांसाठी कायम असते. अशावेळी त्यांची वाट पाहण्याव्यतिरिक्त आपल्याकडे पर्याय नसतो. पण 
कोणत्याही ठिकाणाहून घरी परतण्यासाठी कॅब किंवा ऑटो-रिक्षा बुक करण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो. पण एका तरुणाने अशी काही शक्कल लढवली, ज्याचा कोणी विचारच केला नसेल. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय बनला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याचे तरुण कोणत्याही अडचणीसाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत असतात. नाविन्यपूर्ण आणि लक्ष वेधून घेणार्‍या कल्पना असतील तर साऱ्यांचे लक्ष वेधले जाते. सार्थक सचदेवा या सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसरने अलीकडेच कॅबच्या अडचणींना तोंड देण्यासाठी हॅक शोधला आहे. यानंतर सोशल मीडियात सार्थकचे सारेजण कौतुक करत आहेत. 


सार्थकचा उपाय सोपा आणि साधा होता. घरापासून काही अंतरावर असलेल्या मॉलमध्ये जाण्यासाठी त्याला कॅब बुक करावी लागली. पण वारंवार प्रयत्न करूनही त्याला कॅब मिळू शकली नाही. त्यामुळे तो पुण्यातील रॉयल हेरिटेज मॉलच्या दिशेने पायी निघाला. तिथे पोहोचल्यानंतर त्याने झोमॅटोच्या माध्यमातून मॅकडोनाल्ड्समधून काही खाद्यपदार्थ मागवले.  यानंतर ऑर्डर काही वेळातच डिलिव्हरी बॉय तेथे दाखल झाला.



सार्थक जेवण घेऊन घरी जाईल असे वाटत असताना, त्याने डिलिव्हरी एजंटला वेगळी विनंती केली. ऑर्डर केलेल्या अन्नासह घरी परत जाण्यासाठी राइड देऊ शकतो का? असे त्याने डिलिव्हरी मॅनला विचारले. डिलिव्हरी एजंटने नम्रपणे याला होकार दिला.


सार्थक आणि डिलिव्हरी मॅनने एकत्र प्रवास केला. यानंतर सार्थकने आपले जेवण डिलीव्हरी बॉयसोबत शेअर केले. सार्थक आणि डिलीव्हरी बॉयने एकत्र केलेल्या जेवणाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  या मूळ व्हिडिओला इंस्टाग्रामवर 55 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.