रायगड : धावती रेल्वे पकडू नका, त्याने जीवाला धोका असतो, अशा घोषणा आपण दररोज ऐकतो. मात्र या घोषणा आपण एका कानाने ऐकतो आणि सोडून देतो. अशीच धावती गाडी पकडणं एका वृद्ध व्यक्तीच्या जीवावर बेतलं असतं. मात्र तरुणाच्या प्रसंगावधानामुळे वृद्ध व्यक्तीला जीवनदान मिळालं आहे. तरुणाने आपल्या हुशारीने वृद्ध व्यक्तीची आणि यमराजची ताटातूट केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. (young man save old man life who who fell down while catching a running train at karjat railway station video viral on social media)


नक्की काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळचे 10 वाजून 40 मिनिटं झाले होते. मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर 3 वर वृद्ध व्यक्तीने धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न फसला. धावती गाडी पकडण्याच्या प्रयत्नात वृद्ध व्यक्तीचा हात सटकला आणि ते पडले.


हा सर्व प्रकार त्याच रेल्वेतील मागच्या डब्ब्यात असलेल्या केतन थोरवेने पाहिला. केतनने क्षणाचा विलंब न लावता गाडीतून खाली उडी घेतली. केतनने त्या वृद्ध व्यक्तीला बाजूला केलं आणि पुन्हा त्याने गाडी पकडली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वृद्धाचा जीव वाचवल्याने केतनचं कौतुक होतंय. हा सर्व प्रकार रविवारी 24 जुलैला घडला.