Kolhapur hukka : शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापूरात (Kolhapur) मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात टोळक्यांची मुजोरी पहायला मिळत आहे. अशातच आता कोल्हापूरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापुरात रस्त्यावर खुलेआम हुक्का ओढला जात असल्याने आता चर्चेला उधाण आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूरातील एक व्हिडीओ (Kolhapur Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये एक तरूण खुलेआम हुक्का ओढताना दिसतोय. दोन दिवसापूर्वी शहरातल्या धैर्यप्रसाद चौकात (Dharyaprasad Chowk) प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.


आणखी वाचा - Gautami Patil : लावणी पाहताना प्रेक्षकाचा मृत्यू; गौतमी पाटील म्हणाली, "ते वयस्कर..."


व्हिडीओ दिसत असलेला हा तरुण स्वत: बेटिंग, हुक्का व्यवसायाशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. कोल्हापूरच्या धैर्यप्रसाद चौकात मागील काही दिवसांपासून तरुणांचा माज पहायला मिळतोय. त्यामुळे आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला आहे.


पाहा व्हिडीओ - 



दरम्यान, मध्यरात्री आलिशान गाड्या रस्त्यावर लावून हुक्का ओढत रील बनवला होता. त्यानंतर पोलिसांनी अॅक्शन घेतली आणि हुक्का प्रकरणी अखेर तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येत्या काळात असे प्रकार कोल्हापूरात होऊ नयेत, यासाठी प्रशासन पुर्ण  प्रयत्न करत असल्याचं पहायला मिळतंय.