Viral Video: छत्रपती संभाजी नगरमध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. एका तरुणाने तरुणीला भररस्त्यात मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. (Youth Beating Girl Video Viral)


सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संभाजी नगरच्या सिल्लोड तालुक्यातील वसई बोदवड येथे ही घटना घडली आहे. इथे एक तरुण मुलीला अमानुषपणे मारत असतानाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका मोकळ्या मैदानावर तरुण या मुलीला मारहाण करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.



तरुणीला अमानुष मारहाण


या व्हिडिओमध्ये एक तरुण एका मुलीला मारहाण करताना दिसत आहे. मुलगी वारंवार विनंती करुनही तो थांबताना दिसत नाहीये यात मुलगी मला सोडा अशा पद्धतीची विनंती सुद्धा या युवकाला करते. मात्र तरीही तिच्या विनंतीला न जुमानता हा युवक तिला मारहाण करतोय. तरुणाच्या या कृत्याचे कारण अद्याप समोर आले नाहीये.


प्रेमप्रकरणातून मारहाण


स्थानिक माहितीनुसार, प्रेमप्रकरणातून तरुणाने तिला मारहाण केली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. इतंकच नव्हे तर, व्हिडिओत दिसणाऱ्या मुलांनेच मारहाण करताना हा व्हिडिओ बनवला आहे. मात्र, याबाबत अद्याप तरुणीकडून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली नाहीये.


व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरुणावर तक्रार दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. तर, सोशल मीडियावरही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. छोट्याशा गावात ही घटना घडली आहे. इतकंच, नव्हे तर रस्त्याच्या कडेला उभे राहून या तरुण तरुणीला मारहाण करत आहे. तर, त्याच्याच मित्राकडून त्याने व्हिडिओ काढून घेतला आहे. दोघेही एकाच महाविद्यालयात शिकत होते, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.


व्हिडिओत दिसत असलेल्या दोघा तरुणांची ओळख अद्याप पटलेली नाहीये. तसंच, या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. असं असले तरी सोशल मीडियावर संतापाची लाट पसरली आहे. प्रेमप्रकरणातून मारहाण करण्यात आली आहे का? की अन्य कोणते कारण आहे. हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाहीये.