पिंपरी-चिंचवड : रेल्वेच्या टपावर स्टंट बाजी करू नये अस आवाहन अनेकदा केले जाते..पण त्याला कोणीच गांभीर्याने घेत नाही असंच पिंपरी चिंचवड जवळ देहू रोड रेल्वे स्थानकावर घडलेल्या घटनेनं म्हणावे लागेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वेच्या टपावर चढून स्टंट बाजी करणाऱ्या तरुणाचा हात ओव्हरहेड वायरला लागल्याने तो 80 टक्के भाजला गेल्याची घटना घडलीय. 


१९ वर्षांचा अहमद युसूफ खत्री नावाचा मुलगा रेल्वेवर स्टंटबाजी करत होता. देहूरोड स्टेशनवर हा मुलगा पाणी आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी उभ्या असलेल्या मालगाडीवर तो चढला आणि त्याचा हात ओव्हरहेड वायरला  लागला. त्यात त्याला विजेचा धक्का बसल्याने तो ८० टक्के भाजला.