नागपूर - शहरात शुल्लक कारणावरून हत्यासत्र सुरूच आहे.गेल्या दोन महिन्यात नंदनवन पोलिस स्टेशन हद्दीत मंदबुद्धी का बोलला म्हणून मित्राने मित्राची खून केल्याची घटना घडली होती . तर दुसरी घटना सदर पोलीस स्टेशन हद्दीत माझी दारू का प्यायला  या वादात मित्राने मित्राचा खून केला होता. अशीच एक घटना शुक्रवारी रात्री हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. जितेंद्र चोपडे या  पिपळा फाटा विठ्ठल नगर येथे राहणाऱ्या तरुणाचा खून झाला.दुचाकीचा धक्का लागला या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून त्याची हत्या झाली.

 

  जितेंद्र चोपडे हा त्याच्या मित्र प्रकाश तिवारी सोबत एका हॉटेलमधून शुक्रवारी रात्री जेवण करून घरी परत येत  होता. यावेळी  हुडकेश्वर मार्गावरील जुना नाका परिसरात  आरोपी विजय उगरेजाच्या दुचाकीला गाडीचा धक्का लागला. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला व प्रकरण  नंतर हाणामारीपर्यंत पोहचले. या हाणामारीत विजय उगरेजा व त्याचे दोन भाऊ रोहित आणि रवी उगले यांच्या मदतीने चाकूने वार करून जितेंद्रचा खून केला. याप्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी विजय, रोहित आणि रवी उगरेजा या तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

 

 

हुडकेश्वर पोलिस स्टेशनसमोर नागरिकांचा रोष  

 

 या घटनेनंतर हुडकेश्वर परिसरात नागरिकांचा रोष उफाळून आला. काही नागरिकांनी दोन आरोपींना पोलिसांनी सोडून दिल्याचा आरोप करीत मृतक जितेंद्र चोपडे याचे मृतदेह थेट हुडकेश्वर पोलीस स्टेशन समोर आणले होते.या दरम्यान पोलिसांनी नागरिकांची समजूत घातल्यानंतर परिसरातील नागरिकांनी मृतक जितेंद्र चोपडेचे अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

 

 

 

ReplyForward