बारामतीत कोणी धमकावत असेल तर माझी भेट घालून द्या, पुढचं मी बघतो; युगेंद्र पवारांचा थेट निशाणा नेमका कुणावर?
Maharashtra politics : सुप्रिया सुळेंसाठी बारामतीत प्रचार करणारे अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांना मराठा तरुणांच्या रोषाचा सामना करावा लागला... बारामतीच्या उंडवडी सुपे गावात युगेंद्र पवारांना मराठा तरुणांनी आरक्षणावरून जाब विचारला.
Yugendra Pawar : शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार राजकारणात सक्रीय झालेत. युगेंद्र पवारांनी शरद पवार गटासोबत राहण्याचा निर्णय घेतलाय. बारामतीमध्ये सध्या पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला आहे. बारामतीत कोणी धमकावत असेल तर माझी भेट घालून द्या, पुढच मी बघतो असं म्हणत युगेंद्र पवार यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे.
बारामतीत दहशतीचा आणि वेगळ्या प्रकारचे राजकारण असेल तर माझ्याशी संपर्क करा, मग मी बघतो असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी थेट अजित पवारांना आव्हान दिले आहे. युगेंद्र पवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी गाव भेट दौरे करत आहेत. उंडवडीत त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना सर्वांनी आतापर्यंत त्याबद्दल आभार मानले.
सुप्रिया सुळे गटासोबत जोडल्या जाणाऱ्या कार्यकर्त्यांना धमकावले जात असल्याची चर्चा सध्या बारामती सुरू आहे. या पार्श्वभूमीवर योगेंद्र पवार यांनी प्रस्थापितांना थेट इशारा देत बारामतीत वेगळ्या प्रकारचं राजकारण होत आहे. बारामतीकरांनी असे दहशतीचं राजकारण कधी बघितलं नाही. कोणी तुम्हाला फोन करून धमकावले जात असेल तर थेट माझ्याशी संपर्क करा, पुढचं मी बघतो, असं म्हणत युगेंद्र पवार यांनी थेट बारामतीतल़्या प्रस्तापित पुढा-यांना आव्हान दिलेय.
दिल्लीपुढे झुकणार नाही
दिल्लीपुढे झुकणार नाही, असं म्हणत आजोबांच्या राष्ट्रवादीला 'तुतारी' मिळताच युगेंद्र पवारांनी रणशिंग फुंकलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी शरद पवारांना साथ द्यायचं ठरवलंय. याचसंदर्भात त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली होती. दिल्लीपुढे न झुकण्याचा स्वाभिमानी बाणा जपण्यासाठी आम्ही सज्ज, अशी युगेंद्र पवारांची फेसबुक पोस्ट आहे. युगेंद्र पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये शरद पवार यांच्या सोबतचा फोटो शेअर केलाय, नवं चिन्ह तुतारीचं स्वागत केलंय. त्याच्याखाली दिल्लीपुढे न झुकण्याचा छत्रपती शिवरायांनी शिकविलेला स्वाभिमानी बाणा जपण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. असा उल्लेख त्यांनी केला होता.
कोण आहेत युगेंद्र पवार?
युगेंद्र पवार हे अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास अनंतराव पवार यांचे पुत्र आहेत. ते बारामती कुस्तीगीर संघाचे अध्यक्षही आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पवार घराणंही राजकीयदृष्ट्या विभागलं गेलं. अजित पवार, पार्थ पवार एका बाजूला तर दुस-या बाजूला शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार अशी विभागणी झाली आहे. त्यात आता पवार घराण्यातील आणखी पुतण्या म्हणजे युगेंद्र पवार यांची भर पडली आहे.