मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकासाचा नारळ चार वर्षांपूर्वी फुटला होता पण पुढे काहीच झालं नाही. त्यामुळं मला इथं यावं लागलं. मला यात राजकारण करायचं नाहीय पण या कामाला वेग यायला हवा असा टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी भाजपाला लगावला आहे. मुंबईत नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा टोला लगावला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील विविध प्रश्नांमध्ये हात घातला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवडी, वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबत चर्चा झाली. शिवडीमध्ये बीपीटीला सोबत घेवून पुनर्विकास व्हायला हवा अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. त्यामुळे मुंबईसाठी गृहनिर्माण धोरण लवकर येणं गरजेचे असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. 



गृहनिर्माण धोरण अद्याप का झाले नाही ? यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्र्याकडे वेळ मागितली आहे. मेट्रोचे आरे येथील कारशेड हलवून ते कांजूर मार्गला न्यावे, यामुळे जंगल वाचू शकते असेही त्यांनी सुचविले आहे. 


येणाऱ्या २६ तारखेच्या प्राधिकरणाच्या मिटींगमध्ये सर्व मुद्द्यांचा सकारात्मक विचार करु असे म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी यावेळी म्हटले आहे.