युवासेनेची बैठक संपली, आदीत्य ठाकरे निवडणूक लढवण्याच्या तयारीत ?
युवासेना प्रमुख आदीत्य ठाकरे हे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई : ठाकरे परिवारातील कोणीही निवडणूक लढवत नाही असे सांगितले जात असे. पण अशा चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. युवासेना प्रमुख आदीत्य ठाकरे हे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक शिवसेना भवन येथे नुकतीच पार पडली आहे. आदीत्य ठाकरे यांना सक्रीय राजकारणात आणण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचे सांगण्यात येत आहे.
युवासेनाप्रमुख आदीत्य ठाकरे यांनी आज वरळी, माहीम इथल्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघासाठी ही चाचपणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. आदित्य ठाकरे वरळी, महिम, शिवडी येथून विधानसभा निवडणुक लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या पावसाळी कामा संदर्भात ही बैठक होती असे स्पष्टीकरण आदीत्य ठाकरे यांनी दिले आहे. संपूर्ण मुंबईत अशा प्रकारच्या बैठका होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या पावसाळ्याचे आणि दुष्काळाचे काम महत्वाचे असल्याचेही त्यांनी केले.