ठाणे : ठाण्यात झी मराठी शॉपिंग फेस्टिव्हलला जल्लोषात सुरूवात झाली आहे. आज दुसऱ्याच दिवशी ठाण्यातील टीप टॉप आणि लागू बंधू इथं होममिनिस्टर फेम आदेश बांदेकर यांनी हजेरी लावली. यावेळी रविवारची सकाळ ही गोड मिठाई आणि हिऱ्यांच्या सोबतीनं झाल्याची भावना आदेश बांदेकरांनी व्यक्त केली. टीप टॉपची मिठाई म्हंटली की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी मराठी शॉपिंग फेस्टीव्हलसाठी तर टीप टॉपनं गुळाची मिठाई बाजारात आणली आहे. तर लागू बंधूंनी खास दागिन्यांचं कलेक्शन आणलं असून, सॉलिटर फेस्टिव्हलही  पण त्यांनी खास ग्राहकांसाठी आणलं आहे. झी मराठी शॉपिंग फेस्टिव्हल 23 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून, उद्या भाऊ कदम ठाण्यातील सिनेवंडर इथल्या कोहिनूर आणि मँगो हॉलिडे ला भेट देणार आहेत.


गायत्री दातार उद्या डोंबिवलीतल्या शॉप्सना भेट देतील. या फेस्टीव्हलच्या निमित्ताने तुम्हाला खूप ऑफर्स आणि बक्षिसांची लयलूट करता येणार आहे. अवघ्या १ हजार रूपयांच्या शॉपिंगवर लकी ड्रॉमध्येही तुम्ही सहभागी होऊ शकता.त्यामुळे तुम्हीही या आणि भरघोस बक्षीसं जिंका.