विकास भोसले, झी मीडिया, सातारा : झी मिडीयाच्या दणक्याने सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील दुष्काळी उंबर्डे गावाला पाणी मिळालयं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उरमोडी जलसिंचन योजनेचे पाणी ९ वर्षे संघर्षातुन मिळाले आहे. या प्रकरणाचा झी मीडियाने पाठपुरावा केल्याबद्दल उंबर्डे ग्रामस्थांनी झी मी़डियाचे आभार मानले आहेत.


सातारा जिल्ह्यातील दुष्काळी खटाव माण तालुक्याला, पिण्याचे पाणी मिळावे यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाने उरमोडी योजनेतून हे पाणी पोहचविले आहे. मात्र, या कॅनॅालसाठी जमीन देणाऱ्या खटाव तालुक्यातील उंबर्डे येथील गावकरी पाणी मिळावे म्हणुन गेली ९ वर्षे उरमोडी कार्यालयात खेटा घालत होते. 


शासकीय अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे दुष्काळग्रस्तांना न्याय काही मिळत नव्हता. मात्र, या संदर्भातील वृत्त झी मीडियाने दाखवल्यानंतर कार्यवाही होऊन अखेर उरमोडीचे पाणी उंबर्डेकरांना मिळाले आहे. 


सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील उंबर्डे या गावाला पिण्यासाठी गेली ६० वर्षे टॅकरने पाणी पुरवठा करावा लागतोय. २५ फेब्रुवारी रोजी झी मीडियाने ही बातमी दाखवल्यावर सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर ९ महिन्यानंतर उंबर्डे गावाला पाणी मिळाले आहे.


दुष्काळी भागातील खटाव तालुक्यातील गावाना उरमोडी जलसिंचन योजनेचे पाणी मिळाल्याने तरुण पिढी आनंदात आहे.



झी २४ तास इम्पॅक्ट: साताऱ्यातील उंबर्डे गावाला अखेर पाणी मिळालं