...म्हणून भर उन्हात बाहेर पडले पुणेकर!
उन्हाळ्यात दुपारी बाहेर जाणं टाळण्याचा सल्ला दिला जातो. पुणेकर मात्र भर उन्हात बाहेर पडले होते.
पुणे : उन्हाळ्यात दुपारी बाहेर जाणं टाळण्याचा सल्ला दिला जातो. पुणेकर मात्र भर उन्हात बाहेर पडले होते. निमित्त होत झिरो शॅडो डे चं. दरवर्षी १३ मे रोजी हा अनुभव पुणेकरांना येतो. या दिवशी दुपारी १२.३१ वाजता सूर्य बरोबर आपल्या
डोक्यावर येतो. तेव्हा आपली सावली पायाखाली पडते. त्यामुळे काही मिनिटं सावली गायब झाल्याचा अनुभव येतो. या निमित्तानं पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्थेच्या वतीनं झिरो शॅडोचं प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आलं होतं. हे पाहण्यासाठी अबाल वृद्धांनी गर्दी केली होती. विविध उपकरणांच्या आणि वस्तूंच्या सावली या वेळेत कशा नाहीशा होतात आणि त्यामागील भौगोलिक माहिती या वेळी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दिली.