भंडारा : भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच उपाध्यक्षाची निवडणूक आज होत आहे. नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर या निवडणुकीची चुरस हि आणखीनच वाढणार आहे. 


नाना पटोलेंना विश्वास


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भंडारा आणि गोंदिया दोन्ही जिल्हा परिषदेवर काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष बनेल असा विश्वास माजी खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केलाय. भंडारा जिल्हा परिषदमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची सत्ता आहे. 


कुणाकडे किती जागा?


अध्यक्षपद काँगेसकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. एकूण ५२ जागांपैकी १९ काँग्रेस, राष्ट्रवादी काँगेस १५, भाजप १३, अपक्ष ४ आणि शिवसेना १ असं पक्षीय बलाबल आहे. गोंदिया जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसनं भाजपशी हातमिळवणी केली. काँग्रेसकडे अध्यक्षपद तर भाजपकडे उपाध्यक्षपद आहे. एकूण ५३ जागेपैकी भाजप १७, राष्ट्रवादी काँगेस पक्ष २० तर काँगेसकडे १६ जागा असं पक्षीय बलाबल आहे.