ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडणार आहे. या अटीतटीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्व राजकिय पक्षांचे लक्ष लागले आहे. 


कुठे होणार निवड प्रक्रिया?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनात निवड प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यातील पाच पंचायत समित्यांच्या सभापती - उपसभापती निवडीनंतर जि.प.च्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची ही निवड आठवडाभरानंतर होत आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून ठाणे उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी जबाबदारी पार पाडणार आहेत. 


कशी होणार निवड?


11 ते दुपारी 3 निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे आणि 3 ते 3.30 अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. या पदांसाठी उमेदवारी प्राप्त झालेल्यांपैकी पसंतीच्या उमेदवारास बोट उंच करून पसंती दर्शवण्याची पद्धत या निवड प्रक्रियेसाठी वापरण्यात येणार आहे.  जिल्हा परिषदेच्या 53 जागांपैकी शिवसेनेकडे 26, भाजपाकडे 16, राष्ट्रवादी 10 आणि कॉग्रेस 1 असे पक्षीय बलाबल आहे.