ज्ञानेश्वर पतंगे, झी मीडिया उस्मानाबाद​  :  बालगृहातील अल्पवयीन मुलांची तस्करी करणाऱ्या टोळीचा धाराशिव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील एका महिलेसह दोघाजणांना धाराशिव पोलिसांनी अटक केली आहे. यांच्याकडून 5 बनावट आधार कार्ड, 8 सिम कार्ड पोलिसांनी जप्त केले आहेत. बालगृहातील मुलांचे पालक असल्याचा बनाव करत ही टोळी बालगृहातील मुलांना पळवत असल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे. या मुलांना भीक मागणे व मोबाईल चोरी करण्यास भाग पाडले जात होते. ही टोळी राज्यभर सक्रिय असून याची पाळेमुळे खोदण्यासाठी धाराशिव पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशी घडली घटना
वेगवेगळ्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलांना सुधार गृहात ठेवले जाते. त्या ठिकाणी त्यांच्यावर समुपदेशनही केले जाते. धाराशिवमध्ये सांजा चौकाजवळ असेच बाल सुधारग्रह आहे. या बालगृहातील मुलांना या टोळीने आपलं सावध केलं. या मुलांचे पालक असल्याचे सांगत ही टोळी वारंवार बालगृहात जाऊन या मुलांना भेटायची. त्यानंतर त्यांना वेगवेगळी आमिषे दाखवून ते आपल्या जाळ्यात ओढायचे .बनावट आधार कार्ड दाखवून बालगृहांच्या अधिकाऱ्यांकडून ही टोळी या मुलांच्या संपर्कात यायची आणि अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धुळपेकरत या अल्पवयीन मुलांना पळवायची. धाराशिवमधील बालगृहातील दोन मुलांना या टोळीने पळवलं आहे.


भीक मागणे व मोबाईल चोरीसाठी मुलांचा वापर
अगोदरच गुन्हेगारीत अडकलेल्या या अल्पवयीन मुलांचा ही टोळी मोठ्या कसंबीने गुन्ह्यासाठी वापर करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. या मुलांना वेगवेगळ्या धार्मिक स्थळांमध्ये नेऊन त्यांना मोबाईल चोरी करायला लावले जात होते तसेच चोरीच्या साहित्याची विल्हेवाट लावण्यासाठी ही या मुलांची मुलांचा वापर केला जात होता. जी मुले गुन्हेगारीसाठी वापरणे शक्य नाही त्या मुलांचा भीक मागण्यासाठी ही वापर होत आहे. ही कामे करून घेण्यासाठी टोळी या मुलांची मोठी हरासमेंट करते. त्यांना माराची भीती दाखवून गुन्हेगारीकडे वळवला जातात.


राज्यभर रॅकेट सक्रिय
बालगृहातील मुलांना पळून गुन्हेगारीकडे वळवण्याची ही घटना धाराशिवपूर्ती मर्यादित नाही. या टोळीचे रॅकेट राज्यभर सक्रिय असल्याचा पोलिसांना संशय आहे. या मुलांना पळवण्यासाठी पालक असल्याचा बनाव ही या टोळीतील आरोपींची मोडस ऑपरेनटी आहे. इतर ठिकाणी ही या टोळीने हाच फॉर्मुला वापरला असल्याचा पोलिसांना संशय आहे. या टोळीला पकडण्यासाठी धाराशिव पोलिसांनी पथके तयार केली असून ती आरोपीच्या शोधात परवाना झाली आहेत .


बालगृहातील अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा
बालगृहात आलेल्या अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीपासून प्रवृत्त करण्यासाठी त्यांचे समुपदेशन करण्याचे जबाबदारी बालगृहातील अधिकाऱ्यांवर असते .त्याचबरोबर या मुलांची सर्व काळजी व सुरक्षा ही बालगृहांनीच घ्यायची असते. धाराशिव जिल्ह्यातील बालगृहातील या निमित्ताने अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा उघड झाला आहे .या टोळीतील आरोपी हे खरेच या मुलांचे पालक आहेत का यांची खातरजमा न करता त्यांना या टोळीला भेटू दिले जात होते हे या निमित्ताने उघड झाले आहे. या मुलांच्या सुरक्षिततेकडेही डोळे झाक केली जात होती. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच तस्करी करणाऱ्या या टोळीला बालगृहातील मुलांना पळवणं शक्य झालं. बालगृहातील अधिकाऱ्यांच्या कारभारावर यामुळे संशय व्यक्त केला जात असून हे अधिकारी देखील यात सहभागी आहेत का याचा तपास करावा अशी मागणी होत आहे.


या पूर्वीही तस्करी
धाराशिवमधील बालगृहातून मुले पळवण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत .त्यामुळे या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत. या टोळीचा भांडाफोड करण्यासाठी धाराशिव पोलिसांनी पथके तयार केले असून ती राज्यात रवाना झाली आहेत. या टोळीतील इतर आरोपी ही लवकरच अटक केली जाणार असल्याची माहिती धाराशिवचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली आहे.