Atik Ahmed Shot Dead : गँगस्टर अतीक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद  (Ashraf Ahmed) यांचा एन्काउंटर झाला आहे. 16 एप्रिल रोजी प्रयागराजमध्ये (Prayagraj) त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्याता आली. हे दोघ भाऊ पोलिसांच्या ताब्यात होते. पोलीस दोघांनाही घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला.  तीन हल्लेखोरांनी अतीक आणि अशरफला गोळ्या झाडून ठार केलं. अतीकच्या डोक्यात गोळ्या घालण्यात आल्या तर, अशरफवरही गोळीबार करण्यात आला. हे सर्व पोलिसांसमोरच घडले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. यानंतर आता  महाराष्ट्रात अतिक अहमदचं बॅनर झळकले आहे. या बॅनरवर  अतिक अहमदचा शहीद म्हणून उल्लेख करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशमध्ये दोन दिवसांपूर्वी हत्या झालेला गुंड आणि माजी खासदार अतिक अहमद व त्याचा भाऊ अशरफ यांच्या समर्थनार्थ बीड मधील माजलगाव शहरात भर चौकात बॅनर झळकवण्यात आले  आहेत. या बॅनरवर दोघांचा शहीद असा उल्लेख करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे जनतेत संतापाची लाट उसळली असून दोषींवर कारवाईची मागणी होत आहे .


उत्तर प्रदेशात शंभराहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या माजी खासदार अतिक अहमद व त्याच्या भावाची दोन दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. या घटनेला जातीय रंग देण्याचे मनसुबे काही विघातक शक्तींनी रचले असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी सकाळी बीड जिल्ह्यातल्या माजलगाव येथील आंबेडकर चौकात अतिक व त्याच्या भावाचे पोस्टर लावण्यात आले. त्यात पोलीस बंदोबस्तात झालेल्या हत्येचा निषेध करून दोघांचा शहीद असा उल्लेख करण्यात आला आहे.


या बॅनरच्या विरोधात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने माजलगाव शहरात मोर्चा काढत निदर्शने करण्यात आली. यावेळी एका वृत्तपत्रांमध्ये अतिक अहमद संदर्भात लिखाण केलेल्या चा मजकूर असलेले वृत्तपत्र जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. 


कोण होता अतीक?


उत्तप्रदेशमधल्या (UttarPradesh) गुन्हेगारी विश्वात अतीक अहमदचा मोठा दरारा होता. गुन्हेगारी विश्व असो की राजकीय विश्व अतीकच्या शब्दाला वजन होते.  प्रयागराजच नाही तर संपूर्ण उत्तरप्रदेशमध्ये त्याची दहशत होती. अतीक ज्या जमीन, घर किंवा बंगल्यावर हात ठेवत होता, त्यांचे मालक ते हक्क सोडून निघून जायचे असं देखील बोललं जातं. वयाच्या 17 व्या वर्षी अतीकच्या नावावर हत्येचा पहिला गुन्हा दाखल झाला होता.