विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातला पांढरा वाघ गेल्या काही दिवसांपासून निपचित पडून आहे. ना खातोय, ना पितोय... फक्त एकटक पिंजऱ्याच्या बाहेर बघतोय. सचिनची ही अवस्था पाहून सगळ्यांनाच काळजी वाटतेय. शामू आणि सीता या जोडीच्या या बछड्याचा १८ जानेवारी २००४ ला जन्म झाला. त्यामुळं एकेकाळी सचिन या प्राणीसंग्रहालयाचं मुख्य आकर्षण होता. पण तोच निपचित पडल्यानं सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकलाय.


उपचारांना प्रतिसाद नाही 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन उपचारांना प्रतिसाद देत नसल्यानं प्राणीसंग्रहालयाबाहेरचे डॉक्टरही प्रयत्नांची शर्थ करतायत... काही वर्षांपूर्वी त्याला किडनीचा आजार झाला होता. त्यामुळं उपचारात अडचणी येत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.


बरा होण्यासाठी प्रार्थना 


सचिनसह या उद्यानात २ पांढरे आणि ७ पिवळे असे एकूण ९ वाघ आहेत. पण सचिनच्या आजारपणामुळं अवघ्या प्राणीसंग्रहालयालाच आजारपण आलंय.. सगळ्यांचा लाडका सचिन लवकर बरा व्हावा, अशी प्रार्थना सध्या सगळे करतायत.