नांदेडमधून आणलेल्या हदयामुळे वाचला नवी मुंबईतील रुग्णाचा जीव
ग्रीन कॉरिडोरद्वारे चार मिनिट 18 सेकंदात पार करण्यात आले.
मुंबई: नांदेडमधून ग्रीन कॉरिडोरद्वारे मानवी अवयव मुंबई आणि औरंगाबादला पाठण्यात आले. ग्लोबल रुग्णालय ते विमानतळ हे सात किलो मीटरचं अंतर ग्रीन कॉरिडोरद्वारे चार मिनिट 18 सेकंदात पार करण्यात आले. उज्वला मुंदडा यांचं हृदय नवी मुंबई इथल्या एका व्यक्तीला, दोन किडन्या औरगांबाद इथल्या दोघांना आणि डोळे नांदेडच्या शासकीय रुग्णालयाला दान करण्यात आले.
उज्वला मुंदडा यांच्या अवयवामुळे तिघांना जीवदान तर दोघांना दृष्टी मिळाली आहे. परभणी इथल्या 49 वर्षीय उज्वला मुंदडा या आपल्या मुलासह दुचाकीवरुन जाताना पडल्या. डोक्याला जबर मार लागल्यानं त्यांचा ब्रेन डेड होऊन मृत्यू झाला होता. त्यांच्या अन्य अवयवांच अवयवदान करण्याचा निर्णय मुंदडा कुटुंबीयांनी घेतला.