Maharashtra News : राज्य भरात हिंदू संघटना लव्ह जिहाद (Love Jihad) विरोधता आक्रमक झाल्या असतानाच लातूरमध्ये (Latur) अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. हिंदू जोडप्याचं जबरदस्तीनं धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप होत आहे. या प्रकारमुळे एकच खळबळ उडाली असून मुस्लीम संघटांनी हे आरोप फेटाळले आहेत. यामुळे प्रकरणाचे गंभीर पडसाद उलमटू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. 


धर्मांतराबाबत जोडप्याचा गंभीर आरोप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लातूरच्या उदगीरमध्ये ही धक्कादायक घटना घडल्याचा आरोप केला जात आहे. उदगीरमध्ये हिंदू जोडप्याचं जबरदस्तीनं धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. आपल्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली तसेच मशिदीत नेऊन धर्मांतरासाठी जबरदस्ती करण्यात आली असा आरोप या जोडप्यानं केला आहे.


बुरखा घातल्यानं हल्ला केला


माहिनाभरापूर्वी घटना घडली आहे. उदगीरच्या कल्पना थिएटरमध्ये एक जोडपे चित्रपट पहाण्यासाठी गेलं होतं. मात्र यातील चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीनं बुरखा घातला होता. दुस-या समाजातील मुलीनं बुरखा घातल्यानं काही मुस्लिम तरुणांना आला. त्यांनी या जोडप्याला मारहाण केली. इतकच नाही तर त्यांना बळजबरीनं ऑटोत बसवून मशीदीत नेलं आणि धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला असा आरोप काही हिंदू संघटनेनं केला आहे. 


सूडबुद्धीनं कारवाई केल्याचा मुस्लिम संघटनांचा आरोप


याप्रकरणी उदगीर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. तर, ही कारवाई सूडबुद्धीनं केल्याचा आरोप मुस्लिम संघटनांनी केला आहे.  मुस्लिम संघटनेचे पोलीस ठण्यासमोर आंदोलन केल्याचीही माहिती समोर येत आहे. यातील सर्व आरोपींना पाच दिवसात अटक करावी अशी मागणी आता हिंदू संघटना करत आहेत. तर, पोलिसांच्या विरोधात मुस्लिम समाजाने उपोषण सुरु केले आहे. 


'लव्ह जिहाद' रोखण्यासाठी कायदा करण्यासाठी सरकार विचाराधीन


लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन अधिवेशन सुरु असताना विधानसभेत जोरदार गदारोळ झाला होता. 'लव्ह जिहाद' रोखण्यासाठी कायदा करण्यासाठी सरकार विचाराधीन असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांची विधान परिषदेत दिली होती.लव जिहादच्या मागणीसाठी लाखोंचे मोर्चे निघत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी कायदा करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यासाठी विविध राज्यांतील या संदर्भातील कायद्यांचा अभ्यास केला जात असल्याची माहिती फडणवीसांनी दिली होती.