नांदेड: धर्माबाद न्यायालयाने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात बाभळी येथे ऊच्च पातळी बंधारा बांधण्यात आला होता. गोदावरी नादीवरील या बंधाऱ्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये पाणी जाणार नाही, असा मुद्दा उपस्थित करुन चंद्राबाबू नायडू यांनी बाभळी बंधारा उडवून देण्याची धमकी दिली होती.


चंद्राबाबू नायडू यांनी २०१० साली आंदोलनादरम्यान आपल्या आमदार खासदारांसह महाराष्ट्रात घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती. 2013 साली हे प्रकरण धर्माबाद न्यायालयात सुनावणीस आले. पण तेव्हापासून एकही वेळ नायडू आणि त्यांचे समर्थक न्यायालयासमोर हजर झालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात धर्माबाद न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट काढले आहे.