बीड: बीडच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजय संकल्प मेळाव्यात शरद पवारांसमोरच गटबाजीचे प्रदर्शन घडले.  जयदत्त क्षीरसागर भाषणाला उभे राहिल्यावर संदीप क्षीरसागर समर्थकांनी घोषणाबाजी केली. संदीप क्षीरसागर आणि अमरसिंह पंडित यांनी व्यासपीठावरून खाली येत कार्यकर्त्यांना शांत केले. या मेऴाव्यात धनजंय मुंडे यांनी शरद पवारांच्या गाडीचे सारथ्य करत मेळाव्यास्थळी आले. 


यावेळी क्षीरसागर बंधूसोबत जयंत पाटील, अमरसिंह पंडित,प्रकाश सोळंके मेळाव्यासाठी दाखल झाले. यावेळी संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर यांचा आदरपूर्वक उल्लेख केला. पण त्याचवेळी काही नेत्यांच्या चुकीमुळे पक्षाचे मागच्या वेळी मोठं नुकसान झाले, अशा अप्रत्यक्ष टोला त्यांनी लगावला.