संगमनेर: पुण्यात ज्येष्ठ  नेते छगन भुजबळांचा शरद पवारांनी सत्कार करताना पुणेरी टिळक पगडी ऐवजी फुले पगडी देवुन सत्कार केला होता. यावरुन महाराष्ट्रात पगडीचे राजकारण तापले आहे. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमात सत्काराची पगडी या विषयाचा राजकीय नेत्यांनी चांगलाच धसका घेतला आहे.
 
 संगमनेर तालुक्यातील मांचीहिल येथील कार्यक्रमात याची प्रचिती आली. राष्ट्रवादीचे माजी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख पाटील यांनी तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांचा सत्कार करताना पगडी वयोवृध्द ज्येष्ठ नेते बी. जे. खताळ पाटील यांच्या हातात दिली. किमान त्यांनी पगडी घातली तर कोणी काही बोलणार नाही, असे स्पष्टीकरण गडाखांनी भाषणादरम्यान दिले.