बीड: एक भाऊ गेला तर फरक पडत नाही, हा भाऊ तुमच्या पाठीशी आहे, असे सांगत उदयनराजे भोसले यांनी पंकजा मुंडे यांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचे दाखवून दिले. ते शुक्रवारी बीड येथे पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेस-राष्ट्रवादीने केवळ लोकांना राबवून घेतले आणि राजकारण केले. तसेच सत्ता स्वत:च्या घरातच ठेवली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मीपणा आणि अहंकार आला. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारण हे कायम व्यक्तिकेंद्रीत राहिल्याची टीका उदयनराजे भोसले यांनी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी त्यांनी परळी मतदारसंघात पंकजा यांच्याविरुद्ध उभ्या असलेल्या धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला. पंकजा मुंडे माझी बहीण आहे. त्यांनी गोपीनाथ मुंडे साहेबांना शोभेल असे काम केले आहे. त्यामुळे उरलीसुरली काँग्रेस-राष्ट्रवादी एकटवली तरी पंकजा मुंडे यांचा विजय रोखू शकत नाही. एक भाऊ गेला तर फरक पडत नाही, हा भाऊ तुमच्या पाठिशी आहे, असे आवेशपूर्ण आश्वासन उदयनराजे यांनी पंकजा मुंडेंना दिले.


उद्धव यांच्या टीकेचा समाचार वांद्र्यात जाऊन घेणार - नारायण राणे


तसेच आपण भाजपमध्ये प्रवेश करून कोणाचाही विश्वासघात केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी शरद पवार यांना धोका दिला नाही. समाजाशी बांधिलकी आहे म्हणून पक्ष सोडला. मात्र, परळीच्या जनतेने गोपीनाथ मुंडे यांना धोका देणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहनही उदयनराजेंनी यावेळी केले.