मुंबई : राज्यात एकीकडे मोठ्या प्रमाणात उन्हाच्या झळा बसत आहेत. तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 2 दिवस कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढील 48 तासात धुळे नंदुरबार जळगाव नाशिक मेघगर्जनेसह वादळी वारा गारपिटीची शक्यता आहे. तर औरंगाबाद, जालन्यात मेघगर्जनेसह गारपीट होण्याचाही अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 8 मार्चला नाशिक जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुकर्ग पुणे सातारा अहमदनगर बीज औरंगाबाद जालना परभणी आणि हिंगोली. या भागांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. 



नाशिक जळगाव धुळे नंदुरबार  औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात 9 मार्च रोजी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, अहमदनगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. 


धुळे आणि साक्री तालुक्यातही अनेक ठिकाणी गारपीट झाली. त्यामुळे काढणीला आलेल्या गव्हाची शेती आडवी झाली. हरभरा, मका, ज्वारी, कांदा पुरता उद्ध्वस्त झालंय. पावसामुळे पपई आणि केळीच्या फळबागाही भुईसपाट झाल्या आहेत.  


अवकाळीमुळे उन्हाळी कांदा, गहू, हरभरा या पिकांसह भाजीपाला आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. आंब्याचा मोहरही गळून गेलाय. मालेगाव, सटाण्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागांनाही पावसाचा मोठा फटका बसला आहे.