मुंबई : बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री अभिनयाबरोबरच गायन क्षेत्रातही आपला हात आजमावून पाहत आहेत. श्रद्धा कपूर, प्रियंका चोप्रा, आलीय भट्ट या अभिनेत्रींनी  चित्रपटात गाणे गायले आहे. अशातच भारताची गानकोकीळा लता मंगेशकर यांनी अभिनेत्री श्रद्धा कपूर हीच्या आवाजाबाबत एक व्यक्तव केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रद्धा कपूर आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसह लता मंगेशकर यांच्या घरी गेली होती.  त्या भेटीबद्दल बोलताना लता मंगेशकर म्हणाल्या की, काही दिवसांपूर्वी श्रद्धा कपूर संपूर्ण कुटूंबियांसमवेत आमच्या घरी आली होती. श्रद्धा, तिचा भाऊ सिद्धांत, मावशी पद्मिनी कोल्हापुरी आणि तेजस्विनी ही मंडळी घरी आली होती. मी श्रद्धाला तिच्या लहानपणापासून ओळखते. स्टार झाल्यानंतर ही ती अजून तशीच आहे, याचे मला कौतुक वाटते. तसंच पुढे त्या म्हणाल्या, 'श्रद्धा खूप चांगली गाते आणि ती फक्त चांगली गातच नाही तर ती सूरात गाते.'' चक्क गानकोकीळेने आपल्या गाण्याचे, आवाजाचे कौतुक करावे यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते. 


श्रद्धा कपूरने 'हॉफ गर्लफ्रेंड' या अर्जुन कपूरसोबतच्या चित्रपट 'मैं फिर भी तुमको चाहूंगी' हे गाणे गायले होते. श्रद्धाचे हे गाणं चांगलेच हिटसुद्धा झाले होते. श्रद्धा कपूर प्रभाससोबत साहोमध्ये झळकणार आहे. हा एक अॅक्शन थ्रीलर चित्रपट आहे. याचित्रपटासाठी श्रद्धाने एक चांगली रक्कम मानधन म्हणून मागितली असल्याची चर्चा होती.