मुंबई : बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित नेहमीच आपल्या ग्लॅमरस लूक्समुळे चर्चेत असते. मात्र आता तिच्या ग्लॅमरस लूक्सची नव्हे तर तिच्या बहिणींच्या लूक्सची चर्चा रंगली आहे. यामध्ये माधुरीचेच फॅन्स तिच्या बहिणींच्या अदांवर फिदा झाल्याचे दिसते. माधुरीने नुकताच  एक फोटो सोशल मीडीयावर शेअर केला होता. या फोटोवरून माधुरीच्या बहिणीच्या लूक्सची चर्चा रंगतेय. 
 
देशभरात काल मदर्स डे साजरा करण्यात आला. यानिमित्त सर्व सामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत सर्वांनीच आपल्या आईचे फोटो पोस्ट करून तिच्याबद्दल दोन ओळी शेअर केल्या होत्या. माधुरीने आपल्या आईसोबतचा फोटो सोशल मीडीयावर पोस्ट केला होता. यामध्ये माधुरीची आई एका खुर्चीवर बसली. आईच्या बाजूला माधुरी आणि तिच्या दोन मोठ्या बहिणी बसल्या आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये मोठी बहिण रुपा दीक्षित आणि भारती दीक्षित दिसत आहेत. या फोटोत तीन ही बहिणी ब्लॅक आऊटफीटमध्ये सुंदर दिसत आहेत. मी जे काही होते, जे काही आहे आणि जे काही असेल ते सर्व काही तुझ्यामुळेच आई, हॅप्पी मदर्स डे, अशी कॅप्शन देखील या फोटोला माधुरीने दिली आहे.  


माधुरीने हा फोटो सोशल मीडीयावर शेअर करताचं चाहत्यांनी या फोटोवर कमेंटस आणि लाईक्सचा पाऊस पाडला. या फोटोंवर नेटकरी लिहतात,  तूम्हा सर्वांची स्माईल एकसारखी आहे. आणखी एक नेटकरी लिहतो, तूमच्या बहिणींना याआधी कधी पाहिले नाही. इतर नेटकऱ्यांनी देखील तिच्या लुक्सची प्रशंसा केली. 


माधुरीचा 'द फेम गेम' मधून ओटीटीत डेब्यू


माधुरी दीक्षितने नुकतीच द फेम गेम या ओटीटी वेबसीरीजमध्ये डेब्यू केला. ही वेबसीरीज नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आली. या सीरीजमध्ये माधुरी व्यतिरीक्त संजय कपूर आणि मानव कौल यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली.