मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत आणि अभिनेता हृतिक रोशन यांच्यातील वाद पुन्हा एकदा आता चव्हाट्यावर आला आहे. एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने हृतिकवर अनेक आरोप केले होते. त्यानंतर या दोघांची सगळीकडे चर्चा सुरु झाली. या वादात हृतिकची पहिली पत्नी सुझान खानने उडी घेत याप्रकरणावर तिने एक ट्वीट केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हृतिकशी लग्न करण्याची इच्छा तसंच त्याने त्याच्या घटस्फोटानंतर कंगनाकडे केलेलं दुर्लक्ष अशा अनेक गोष्टींवर कंगनाने भाष्य केले आहे. ही मुलाखत सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. त्यानंतर सध्यातरी हृतिकची प्रतिक्रीया आली नसली तरी सुझानचे ट्वीट मात्र चर्चेत आले आहे. 
कोणाचंही नाव न घेता तिने आपल्या ट्विटच्या माध्यमातून हृतिकची पाठराखण केली आहे. एका चांगल्या माणसासोबत काहीही वाईट घडू शकत नाही, असं तिने या ट्विटमधून म्हटलं आहे.



कंगना आणि हृतिकमध्ये प्रेमसंबंध असल्याचा दावा कंगनाने केला होता, तर हृतिकने या दाव्याला नकार दिला होता. त्यावरून त्यांच्यातला वाद दरम्यानच्या काळात विकोपाला पोहोचला होता. आता या मुलाखतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा हा वाद चर्चिला जात आहे.