The Kashmir Files वर बंदी; प्रेक्षकांना नाही पाहता येणार इतिहासातील दाहक वास्तवाचं पान
विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri)दिग्दर्शित `द कश्मीर फाईल्स` (The Kashmir Files)चित्रपटाने देशात बंपर कमाई केली. या चित्रपटात काश्मिरी पंडितांवर झालेला अत्याचार आणि त्यांना त्यांच्याच मायभूमीतून पलायन करण्यास भाग पाडण्यात आल्याचं कथानक हाताळलं गेलं.
मुंबई : विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri)दिग्दर्शित 'द कश्मीर फाईल्स' (The Kashmir Files)चित्रपटाने देशात बंपर कमाई केली. या चित्रपटात काश्मिरी पंडितांवर झालेला अत्याचार आणि त्यांना त्यांच्याच मायभूमीतून पलायन करण्यास भाग पाडण्यात आल्याचं कथानक हाताळलं गेलं.
अशा या चित्रपटाला इतर देशातही भरघोस प्रतिसाद मिळत असतानाच आता, देशात 'द कश्मीर फाईल्स' (The Kashmir Files)चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. चित्रपटात एकतर्फी बाजू दाखवल्याचा आरोप करत, हा चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या दोन महिन्यांपूर्वीच म्हणजेच 11 मार्चला हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला. या चित्रपटात 1990 साली काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय, आपलेच घर सोडून विस्थापन करावे लागण्याची कहाणी दाखवण्यात आली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटाची प्रशंसा केली होती. हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यावरून राजकीय वातावरणही तापले होते. भाजपशासित राज्य आणि इतर राज्यात यावरून वाद झाला होता. सोशल मीडियावरही यावरून दोन गट पडले होते. कदाचित या साऱ्याचा फायदा चित्रपटाच्या कमाईत दिसून आला.
चित्रपटावर बंदी ?
दरम्यान, इथं भारतात चित्रपटाच्या कमाईची घोडदौड सुरु असतानाच तिथं एका देशानं मात्र आशिया खंडातील एका देशानं मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणारा देश आहे, सिंगापूर.
सिंगापूरच्या अधिकाऱ्यांनी 'द कश्मीर फाईल्स' (The Kashmir Files)चित्रपटावर बंदी घातली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा चित्रपट वेगवेगळ्या समाजातील मतभेदांना प्रोत्साहन देऊ शकतो. एवढेच नाही तर या चित्रपटात एकतर्फी बाजू मांडण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या काश्मीर वादात हिंदुंचा छळ होताना दाखवला जातो, तर एकतर्फी बाजू दाखवण्यात आल्याचे म्हटले आहे.
परिणामी, धार्मिक वादाचा फटका या चित्रपटाचा बसल्याचं स्पष्ट होत आहे. अद्यापही या निर्णयावर चित्रपटातील कोणाही व्यक्तीची प्रतिक्रिया समोर आलेली नाही.