नवी दिल्ली: डेविड धवन यांच्या ६५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून वरून धवनने आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँन्च केले. जुडवा-२ असे या आगामी चित्रपटाचे नाव असून काही दिवसातच याचा ट्रेलर लाँन्च होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु, १९९७ मध्ये सलमानच्या जुडवाने जी धमाल केली होती तशीच धमाल हा चित्रपट करणार का, याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. या पोस्टर मध्ये वरून दोन वेगवेगळ्या रूपात दिसत आहे. हे पोस्टर शेयर करून वरुणने ट्विट केले की, ''डेविड धवन यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांची ४३ सावा चित्रपट 'जुडवा२.' त्याचबरोबर चित्रपट दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले. 




बॉलिवूड.कॉम या वेबसाईटच्या वृत्तानुसार या चित्रपटाचा ट्रेलर सोमवार म्हणजेच २१ ऑगस्टला प्रदर्शित होईल. या ग्रँड इन्व्हेन्टला वरुण धवन, जॅकलिन फर्नांडीस, तापसी पन्नू आणि डेविड धवन उपस्थित राहतील. चित्रपटात राजपाल यादव आणि अनुपम खेर मुख्य भूमिकेत असतील. तर सलमान खान पाहुणे कलाकार म्हणून हजेरी लावणार आहे.