ठाणे : आज भारतात लाँच झालेल्या आयफोन १० च्या खरेदीनिमित्त ठाण्यातल्या एका तरुणानं चक्क घोड्यावरून मिरवणूक काढली. महेश पालिवाल असे या तरुणाचे नाव आहे. या मिरवणुकीपुढे या आयफोन चाहत्याचे मित्र 'आय लव्ह आयफोन टेन' असे बॅनर घेऊन चालत असल्याचंही या व्हिडिओमध्ये दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत एखादी महागडी वस्तू घेतली तर घराजवळ लागलेले बॅनर्स बघायला मिळाले होते. मात्र चक्क मिरवणूक काढून आयफोनची खरेदी करणारा महेश हा पहिलाच महाभाग असावा अशी चर्चा रंगू लागली आहे.
 
अलिकडेच अॅपलनं आयफोन टेनची घोषणा केली होती. भारतासोबत अमेरिकेतही आजपासूनच आयफोन  टेन उपलब्ध होत आहे.


 २७ ऑक्टोबरपासून विविध ई कॉमर्स वेबसाइटवर या फोनचं ऑनलाइन बुकिंग सुरू झाले आहे. आता त्याची अधिकृत रिटेल विक्री सुरू होत आहे.
 
 या फोनच्या किंमतीबाबत आणि फिचर्सबाबत अॅपलप्रेमींना सगळ्यांनाच उत्सूकता आहे. आयफोन टेनमध्ये काय नवीन फिचर्स आहेत.