डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा ३५व्या वर्धापनदिन सोहळा सोमवारी पार पडला. यावेळी पालिकेतर्फे अत्रे रंगमंदिराचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात राजकीय नेत्यांनी शाब्दिक फटकेबाजीही केली. मात्र, हा कार्यक्रम सध्या एकाच वेगळ्या कारणामुळे गाजत आहे. 


वर्धापनदिनाच्या या कार्यक्रमात नगरसेविकांनी सांस्कृतिक नृत्य सादर केले. यावेळी कल्याण-डोंबिवलीतील अनेक नाट्यरसिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे कार्यक्रम संपल्यानंतर अनेकांच्या तोंडी नगरसेविकांनी सादर केलेल्या नृत्याचीच चर्चा होती. नृत्यातला हा उत्साह जरा कामातही दाखवा, अशी शेरेबाजी यावेळी काही जणांनी केली.